Home

 मैत्री धडक मोहीम – २०१६                                                                                                  

        कोणताही बालमृत्यू ही दुर्दैवी घटना. कोवळी पानगळच. मेळघाटातील आदिवासी बालकांची ही पानगळ दरवर्षी ठरलेलीच. काहीतरी नक्की बिघडलेय एवढे कळते. पण काय करायचे? हे समजत नाही. अशी पानगळ जर आपण वाचवू शकलो तर!

हे शक्य आहे. आपल्या सहभागाने आणि थोड्याशा प्रयत्नाने आपणही बालमृत्यू नक्की वाचवू शकता. हो. “मैत्री”च्या मेळघाटातील धडक मोहिमेत स्वयंसेवकांनी आजवर शेकडो बालकांचे जीव वाचवले आहेत.  

मेळघाट..जसा निसर्गाने संपन्न तसाच कुपोषणाने होणार्‍या बालमृत्यूंमुळेही दुर्दैवी. पावसाळा सुरु झाला की येथील बालमृत्यूच्या बातम्या वाचायला, ऐकायला आणि पहायलाही मिळतात आणि लगेच विसरल्याही जातात.

पण “मैत्री”चे ’मेळघाट मित्र’ मात्र धडक मोहिमेची तयारी करत असतात. पावसाळ्यातील होणारे बालमृत्यू कसे वाचवता येतील, याचे नियोजन करत असतात. प्रत्यक्ष मेळघाटातील दुर्गम गावांमधे दहा दिवस राहून आदिवासी बालकांना तातडीची मदत करणे, औषधे उपलब्ध करणे, वैद्यकीय मदत वेळेवर पोहचवणे, आणि ’एकही बालमृत्यू होऊ देणार नाही’ या निश्चयाने हे ’मेळघाट मित्र’ रात्रंदिवस आदिवासी लोकांसोबत राहतात. आरोग्य शिक्षण हा या मोहिमेतील महत्वाचा भाग आहे.

यावर्षीही “मैत्री”ने मेळघाटातील अतिदुर्गम ११ गावांमधे धडक मोहिमेचे आयोजन केले आहे. १५ जुलै ते २ ऑक्टोबर या कालावधीत १० गटांमधे २५० स्वयंसेवक स्वखर्चाने या दुर्गम गावांमधे प्रत्यक्ष मुक्काम करणार आहेत. या मोहिमेत अर्थातच कोणीही सहभागी होऊ शकते. तेथील राहणे आणि जेवण यासाठी १५०० रु. खर्च येतो. प्रत्येक सहभागी स्वयंसेवकाने हा खर्च स्वत: करणे अपेक्षित आहे. आपणही आपला सहभाग निश्चित करा. आणि इतरांनाही सांगा.

धडक मोहीमेची उद्दीष्टे:

 • सहा वर्षावरील मुलांच्या आजारपणाकडे लक्ष देणे.

 • एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे.

 • गरोदर स्त्रियांना दररोज भेटणे आणि त्यांचे आरोग्य शिक्षण करणे.

 • कुपोषित मुलांच्या घरी भेटी देणे आणि त्यांच्या पालकांना आहाराबद्द्ल मार्गदर्शन करणे.

 • गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविणे.

 • साध्या आजारांवर उपचार करणे.

 • प्रथमोपचार पध्दती अवलंबविणे.

 • शासकिय आरोग्य विभाग आणि अदिवासी यांच्यामधे दुवा साधणे.

 • आणि हे सगळं करतांना आपलं स्व-शिक्षण घड्वुन आणणे व महाराष्ट्रातील आदिवासी भागातले खरे प्रश्न डोळ्सपणे समजुन घेणे.  सोबतच स्वतः मधले नेतृत्वगुण, लोकांमधे बोलण्याचे कसब , रुग्णाला समजावुण सांगणे, लहान अबोल आदिवासी मुलांन बोलते करणे, व आजार – उपचार यांच्यावर प्राथमिक माहिती करुन घेणे. 

या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व व्यक्ती सहभाग घेऊ शकतात.( शैक्षणिक पात्रता, अर्हता, कार्यक्षेत्र यांचे कुठलेही बंधन नाही). प्रत्येक बॅचमध्ये २० स्वयंसेवक असतील. प्रत्येकाचा खर्च रू. १५०० आहे.

संपर्क :

 

“मैत्री”  कायार्लय  :     020 25450882 /8605914086       maitri1997@gmail.com

रामेश्वर फड:               9404103706            ramphad76@gmail.com 

राजू  केंद्रे :                70661 36624

डॉ.अभिजित कस्तुरे:    9970547016           abhijeetkasture18@gmail.com

ऋषी आंधळकर:         9423788541

 

Website : www.maitripune.net

4 Responses to Home

 1. Raju Kendre says:

  मागच्या दोन वर्षाचा धडकमोहीमचा अनुभव हे मला माझ्या भावी आयुष्यासाठी खुप मोठी शिदोरी आहे. मागच्या वर्षीचा अनुभव तर खुपच चांगला होता, एक बेस कॅम्प पुर्णवेळ सांभाळण्याच्या जबाबदारीतुन खुप काही शिकायला मिळाले. माझ्या अनुभवानुसार धडकमोहीम मध्ये येणा-या साठी स्वयंसेवकांसाठी अविस्मरणीय क्षण आहे, कारण तुम्हीच तिथल्या कोरकु बांधवांकडुन खुप काही शिकता, तुम्हाला एका वेगळया जगात जगण्याचा हा अनुभव खुपच चांगला असेल. !!!!!

 2. shantibhushan birgale says:

  Great days with maitra !!!

 3. mrs Varsha Betawadkar says:

  Khup varshe maitrivishayi vachte, eikate aahe. LL var pH kela hota. Punyamadhlya corporation shalamadhye jaun kam karayala awadel ASA nirop thevala aahe. Mazi maitrin Anita BHOLE aani mi sahabhagi hou ichito.
  Thx

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s