Report 2013

बालमृत्यू वाचवणारी “मैत्री” धडकमोहिम,२०१३

यावर्षी “मैत्री”ची धडक मोहिम १९ जुलै ते ५ ऑक्टोबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आली. मेळघाटातील अतिदुर्गम आठ गावात (चुनखडी,खडीमल,नवलगाव,घाणा,लाखेवाडा,बोदु,चोबिता,बिबा) स्वयंसेवकांच्या मदतीने दररोज गावातील मुलांच्या आरोग्याची आणि आवश्यकतेप्रमाणे उपचाराची जbaaबाबदारी “मैत्री”च्या स्वयंसेवकांनी उचलली. याच कालावधीत मेळघाटातील आजारांचे आणि पर्यायाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या काळात गावात आरोग्य सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असते. धडक मोहिमेत स्वयंसेवकांच्या मदतीने यासाठी प्रयत्न करण्यात आला.      

स्वयंसेवकांना दररोज काही नियमित कामे ठरवून दिली होती. या मध्ये एक वर्षाखालील बाळांना दररोज बघणे, आजारी असल्यास उपचार करणे, गरोदर स्त्रियांना भेटून त्यांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची यासाठी मार्गदर्शन करणे, कुपोषित बाळांच्या पालकांना भेटून त्यांना आजार आणि आहार विषयक मार्गदर्शन करणे अशी कामे ठरवली होती.

धडक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी “घाणा” या चिखलदरा तालुक्यातील दुर्गम गावात चार वर्षाच्या सुभाष रामदास सावलकर या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि आम्हाला यापुढे किती सतर्क रहावे लागेल, हे कळाले. यामुळेच पुढील तीन महिन्यात आमच्या स्वयंसेवकांनी आठ गावात एकही बालमृत्यू होऊ दिला नाही.

धडक मोहिम कशासाठी?

 • चिखलदरा तालुक्यातील आठ अतिदूर्गम गावांमधील बालके, स्त्रिया आणि गंभीर आजारी रुग्णांसाठी.
 • या आठ गावातील ५१ गरोदर स्त्रियांना औषधोपचार, मार्गदर्शन आणि प्रसंगी तात्काळ मदत मिळण्यासाठी.
 • या गावांमधील १५३ तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांना पावसाळ्यात होणार्‍या रोगांपासून वाचवण्यासाठी.
 • पाच वर्षाखालील सर्व आजारी बालकांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी.
 • महाराष्ट्रातील स्वयंसेवकांना मेळघाटच्या प्रश्नाला जोडण्यासाठी.

 

असे वाचले बालमृत्यू

         या काळात अनेक वेळा बालमृत्यू होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. पण वेळीच उपाययोजना केल्याने असे होऊ शकणारे अनेक बालमृत्यू आम्ही वाचवू शकलो. ही यादी खुप मोठी आहे पण प्रातिनिधिक उदाहरणे येथे देत आहोत.

१. चुनखडी या गावातील एक १५ महिन्यांचे बाळ. वजन ७ किलो, तीव्र कुपोषित. अशातच त्याला गंभीर nyन्युमोनियाची लागण झाली. धडक मोहिमेदरम्यान अनेक वेळा सांगुनही पालकांनी दवाखान्यात (चुर्णी येथील ग्रामीण रुगणालयात) नेण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ. आशिष चांगोले या “मैत्री” च्या स्वयंसेवकाने त्यावर घरीच उपचार सुरु ठेवले. नियमितपणे घरी जावुन त्या बाळाची काळजी घेतली. अगदी रात्री सुद्दा. बाळ आता ठिक आहे. वजनातही वाढ होत आहे.

२.खडीमल या गावातील एका गरोदर महिलेच्या अंगावर सुज होती. तिला तीव्र रक्तक्षय. हिमोग्लोबिन फक्त ३.५ मि.ग्रॅ.भरले. तिची नऊ महिने पुर्ण होण्याआधीच डिलिवरी झाली. खुप रक्तस्त्राव झाला. बाळाचे वजन फक्त १.८ किलो भरले. घटना २२ सप्टेंबर, २०१३ या दिवशी घडली. सुदैवाने त्याच दिवशी थेट मालदिवहून धडक मोहिमेत सहभागी झालेल्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रज्ञा झरकर गावात आल्या. त्यांनी आईची आणि बाळाची नाजूक अवस्था बघून काही प्राथमिक उपचार केले. पण कोणत्याही परिस्थितीत तिला दवाखान्यात घेवून जाणे भागच होते. तेथून काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करुन गाडी बोलावली. गाडी येईपर्यंत डॉक्टरांनी उपचार सुरु ठेवले. नंतर तिला दवाखान्यात भरती केले. आता दोघेही सुखरुप आहेत. बाळाचे वजनही वाढत आहे.

३.बिबा या गावात एक सुदृढ बाळ जन्मला आलं. तेंव्हाचं वजन ३.५ किलो होतं. पण त्याला डायरिया झाला. आणि त्यांच वजन २.५ किलो पर्यन्त कमी झाले. हि खुपच चिंताजनक गोष्ट होती. त्याला दवाखान्यात भरती केलेही. पण त्या बाळाच्या आई-वडिलांनी उपचार अर्धवट असताना त्याला घरी आणलं. त्यांच्या म्हणन्यानुसार दवाखान्यात निटपणे उपचार झाला नाही. मग घरातच उपचार सुरु केले. “मैत्री”च्या स्वयंसेवकांनी त्याला दररोज घरी जावुन काळजी घेतली आणि त्याला बरे केले. बाळ आता ठिक आहे. या मोहिमे दरम्यान अशी अनेक बालकं स्वयंसेवकांच्या तात्काळ मदतीमुळे वाचवता आली.

काहीनिष्कर्ष

 • १९ जुलै,२०१३ ते ०५ ऑक्टोबर २०१३ (७८ दिवस) या दरम्यान ० ते १ वर्षापर्यंतच्या आणि कुपोषित असलेल्या एकाही बाळाचा मृत्यू होऊ दिला नाही.
 • प्रामुख्याने २० हुन अधिक महिला व बालके यांना दवाखान्यात भरती करण्यात आले.
 • गावांमध्ये दररोज ४० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले.
 • धडक मोहिमेनंतर तीव्र आणि मध्यम कुपोषित मुलांची संख्या १५३ वरुन ९८ पर्यंत कमी झाली.
 • महाराष्ट्रातील ८८ स्वयंसेवक स्वखर्चाने या मोहिमेत सहभागी झाले.
 • सर्व आठ गावात स्वयंसेवकांनी दररोज घरोघरी भेट दिली.
 • पथनाटयाद्वारे आरोग्य शिक्षणाचे महत्व पटवुन देण्याचा प्रयत्न.
 • काही अपवाद वगळता शासकीय यंत्रणा, उदा. ग्रामसेवक, पटवारी, आरोग्य कर्मचारी, अनेक शिक्षक कुठेच काम करताना दिसले नाहीत.

 

मधुकर माने आणि “मैत्री” धडक मोहिम टीम.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: