Report 2011

“मैत्री”धडकमोहीम-२०११

मेळघाटातील धारणी तालुक्यातील रेहट्या हे एक गाव. तालुक्याच्या ठिकाणापासून ५०/५५ कि.मी. अंतरावर या गावात कृष्णा नावाचा ३ वर्षाचा मुलगा कुपोषणाच्या तिसर्‍या श्रेणीत होता. पालकांनी त्यांच्या पद्धतीने त्याला जगवायचा प्रयत्न चालु ठेवला होता. अशातच त्याला गंभीर निमोनियाची लागण झाली. पण यापूर्वी दवाखान्याचा अनुभव चांगला नसल्याने वडिलांनी घरीच उपचार सुरु ठेवले होते. “मैत्री”च्या धडक मोहीमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी पालकांना तयार केले आणि त्याला भरतीही केले. पण पुन्हा यावेळीही अनुभव यायचा तोच आला. दवाखान्यात बाळाकडे कोणी नीट लक्ष न दिल्याने पालक त्याला घेऊन पुन्हा गावात आले. शेवटी धडक मोहीमेतील डॉक्टर स्वयंसेवकांनी पालकांना विश्वासात घेऊन त्याला गावातच उपचार केला. रोज लक्ष दिले आणि त्याला वाचविले.

“मैत्री”ची मेळघाटातील धडक मोहीम दरवर्षी पावसाळ्यात आयोजित केली जाते. आधीच कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात हमखास उद्भवणार्‍या निमोनिया, डायरिया अशा आजारांनी या काळात बालमृत्यूचे प्रमाण वाढते. आधीच दुर्गम असलेल्या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या काळात योग्य वेळी उपचार मिळाल्यास होणारे बालमृत्यू हमखास टाळता येतात हा आजवरच्या धडक मोहीमेतील अनुभव लक्षात घेऊन मैत्रीने २० जुलै, २०११ ते १६ ऑक्टोंबर, २०११ याकाळात धडक मोहीमेचे आयोजन केले.

मेळघाटात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात गेल्यावर्षी एकूण ५०९ मालमृत्यू झाले होते. त्यापैकी एकट्या धारणी तालुक्यात ३५९ बालमृत्यू झाले होते. खरंतर “मैत्री”चे पूर्णवेळ काम चिखलदरा तालुक्यातील हतरु आणि चुर्णी या भागात आहे. पण बालमृत्यूंcचे आकडे बघून यावर्षी “मैत्री”ने धारणी तालुक्यातील ३३ गावात धडक मोहीम राबविली. खरंतर, ४७ गावात धडक मोहीमेचे नियोजन केले होते, पण अनियमित आणि पुरेस्या स्वयंसेवकांअभावी आम्ही उरलेल्या ३३ गावांपर्यंत पोहोचू शकलो.

या धडक मोहीमेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि इतर आठ राज्यांतून ३३२ स्वयंसेवक सहभागी झाले होते. हे स्वयंसेवक सर्व क्षेत्रातील होते. अगदी वय वर्षे ७२ असलेले स्वयंसेवकही या धडक मोहीमेत सहभागी झाले होते. ३३गावातीलसहावर्षाखालील४३६८बालके, एकवर्षाखालील७७२बालके, ४७३गरोदरस्त्रियाआणि२०६कुपोषितबालकांकडेआपणविशेषलक्षदिले. आजांरावरउपचारकरण्याबरोबरचआपल्यास्वयंसेवकांनीत्यांनाआरोग्य शिक्षणाचे महत्वही पटवून देण्याचा प्रयत्न केला. गंभीर आजारी असलेल्या एकूण ३९ बालकांना आपण दवाखान्यात भरती केले. याकामी आरोग्यविभागाकडूनही सहकार्य मिळाले.

या सर्व कामाचा परिणाम म्हणजे गेल्यावर्षी ज्या गावांमधे फक्त पावसाळ्यात ५३ बालमृत्यू झाले होते, त्या गावांमधे या वर्षी २४ बालमृत्यू झाले आहेत. आपण निम्यापेक्षा जास्त बालमृत्यू वाचविण्यात यश मिळवले आहे. झिल्पी या गावात गेल्यावर्षी फक्त पावसाळ्यात आठ बालमृत्यू झाले होते. यावर्षी या काळात, एकही बालमृत्यू नाही.

या मोहीमेच्या माध्यमातून बालमृत्यू वाचविण्याचे काम तर झालेच, पण सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांना एक वेगळा अनुभव शिकायला मिळाला. या धडक मोहीमेसाठी प्रत्यक्ष मेळघाटात येऊ शकले नाहीत पण औषधे, रेशन, भांडी आणि आर्थिकही स्वरुपात मदत करणार्‍या व्यक्तींची यादीही खूप मोठी आहे. या सर्वांच्या मदतीशिवाय मोहीम पूर्ण होऊ शकली नसती. 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: