Maitri Dhadak Mohim 2012-Report

“मैत्री” धडक मोहिम, २०१२.

मैत्री”ची धडक मोहिम यावर्षी धारणी तालुक्यातील १० गावात आयोजित केली होती. हिराबंबई आणि कासमार या दोन ठिकाणच्या शिबिरात राहुन स्वयंसेवकांनी एकूण १० गावात काम केले. यापैकी पाच गावात “मैत्री”ने पहिल्यांदाच काम केले. या गावांमधे बालमृत्यूचे गेल्यावर्षीचे प्रमाण जास्त होते. फक्त पावसाळ्यात या गावांमधे २०११ या साली १७ बालमृत्यू झाले होते. त्यामुळेच या गावांत धडक मोहिम करण्याचे ठरविले होते.

या धडक मोहिमेत यावर्षी महाराष्ट्रातील मिरज, पुणे, सोलापुर, अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, नाशिक, चंद्रपुर, लातुर, कोल्हापुर अशा जिल्ह्यामधील स्वयंसेवक सहभागी झाले. एकूण ९२ स्वयंसेवक यावर्षी धडक मोहिमेत सहभागी झाले होते. मुख्यत: महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त असला तरी ६०/६५ वर्षांचे दोन आजोबाही या धडक मोहिमेत अगदी प्रतिकुल परिस्थिती असताना सहभागी झाले.

रोज आजारी मुलांना पाहणे, उपचार करणे, त्यांच्या पालकांशी बोलणे अशी कामे स्वयंसेवकांनी केली. या कामासाठी गावातील शिक्षक, अंगणवाडी, आशा आणि काही तरुणांना सोबत घेतले जात होते. त्यामुळे गावातील लोकांशी संवाद करायला सोपेही जायचे. ही कामे करत असताना आदिवासींचे नेमके प्रश्न समजून घेणे, त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करणे, अशीही कामे चालुच होती. रोज नवीन प्रश्न / घटना कळत होत्या, त्याबद्दल रोजच्या बैठकित चर्चा केल्या जायच्या. योग्य उपाय काय असेल? याबद्दल सर्वानुमते उपाय शोधायचा प्रयत्न शिबिरातल्या रात्रीच्या बैठकित केला जायचा आणि दुसर्‍या दिवशी कामाला पुन्हा सुरुवात होत होती.

काही गंभीर आजारी मुलांना दवाखान्यात पाठवायचा प्रयत्नही स्वयंसेवकांनी केला. aaaajaparyMtआजपर्यंत अशी ३२ बाळे स्वयंसेवकांच्या प्रयत्नामुळे दवाखान्यात भरती केली. अनेक बाळांना घरातच उपचार केला आणि बरे केले. विशेषत: न्युमोनिया, डायरिया असेच आजार जास्त होते. खरुजेचे रुग्णही खुप होते.

आरोग्य शिक्षणावर नेहमीप्रमाणे जास्त भर होता. खास करुन गरोदर स्त्रियांना रोज भेटुन त्यांना आहार, स्वच्छता याबद्दल माहीती दिली जायची. दररोज लोहगोळ्या घेतल्या का? याची चौकशी केली जायची. त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न व्हायचा. गावातील लोकांना सोबत घेऊन सामुहिकपणे स्वच्छता करण्याचा प्रयत्नही स्वयंसेवकांनी केला. साचलेल्या पाण्याला वाट करुन देणे, गावातील खड्डे बुजवणे, शोषखड्डे करणे अशी कामेही गावकर्‍यांच्या मदतीने करण्यात आली.

कुपोषित मुलांच्या पालकांना रोज भेटायचेच असे ठरविले होते. सर्व दहा गावांतील सॅम आणि मॅम (अतिकुपोषित आणि मध्यम कुपोषित) बालकांची यादी तयार होती. त्याप्रमाणे भेटी केल्या जात असत. यापैकी कोणी आजारी असेल तर तात्काळ उपचार केला जायचा. पालकांना भेटुन बाळाच्या आहाराबद्दल, स्वच्छतेबद्दल सांगितले जायचे. हे सोपे नसायचे. पालक लगेच ऎकायचे नाहीत. वर्षानुवर्षाच्या पारंपारिक उपचारावरच त्यांचा भर होता. पण स्वयंसेवकांचा प्रयत्न चालु असायचा. कधी पालक ऎकायचे कधी वेळ लागायचा. असाच एक ’नवल’ नावाचं बाळ.

नवल. कासमारमधील SAM मधील तीन वर्षाचे बाळ. (SAM- severe acute malnutrition). आधीच कुपोषित, त्यात खुपच तापलेला. त्यात पाऊसही दमदार. पालकांना सांगुनही ते दवाखान्यात न्यायला तयार होईनात. पाऊस उघडल्यावर जाऊ म्हणाले. पण तोपर्यंत उपचाराची खुपच आवश्यकता होती. DDडॉ. आशिष आणि डॉ. अभिजित यांनी इतर स्वयंसेवकांच्या मदतीने या बाळावर रोज लक्ष ठेवले. अगदी रात्री उठूनसुद्धा त्याला औषधे दिली. अगदीच गंभीर असलेला नवल आता ठिक आहे. सुरुवातीला अजिबात न एकणारे त्याचे आईवडील आता नीटपणे आणि सांगितल्याप्रमाणे नवलची काळजी घेत आहेत. पुर्वीपेक्षा त्याचे वजनही वाढले आहे.

“मैत्री”च्या धडक मोहीमेत असे प्रसंग रोजचेच. कधी पालक ऎकतात तर कधी नाही. एकत नसले की रात्री बैठकित चर्चा केली जायची. त्यावर उपाय शोधण्याचा सर्वजण प्रयत्न करत. आशा, अंगणवाडी आणि दाई यांच्यासोबतच गावातील इतर चांगल्या लोकांचीही मदत घेतली जात होती.

प्रत्येक गावातील शाळेमधे आपल्या सर्वच स्वयंसेवकांनी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले. आजारी मुलांना उपचार केला. ’खरुज’ या आजाराचे प्रमाण जास्त आढळले. टिटंबा या गावातील आश्रमशाळेत अशी खुप मुले आढळली. मुलांची संख्या ३५० च्या आसपास होती. या सर्वांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी शाळेतील काही मोठ्या वर्गातील मुलांना सोबत घेऊन पथनाट्य केले.

एकही बालमृत्यू होऊ द्यायचा नाही असेच ठरविले होते. तसा निश्चयही केला होता. पण तरीही बालमृत्यू झालेच. या सर्व काळात एकूण सात बालमृत्यू झाले. मागील वर्षीच्या तुलनेत आपण दहा मृत्यू वाचवु शकलो. पुढे नक्कीच प्रयत्न चालु राहतील.

“मैत्री”ची ही धडक मोहीम महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीनेच होत असते. कोणी प्रत्यक्ष येऊन काम करते तर अनेकांना मेळघाटात जाणे शक्य होत नाही. पण आर्थिक किंवा साहित्य रुपात मदत करुन अनेकजण हातभार लावतात. आर्थिक मदतीशिवाय औषधे, किराणा अशीही अनेकांनी मदत केली.

यावर्षी ’राजाराम’ने  स्वत:  मेळघाटातील धडक मोहीमेची जबाबदारी स्विकारली होती. राजाराम मेळघाटातील “मैत्री”चा एक पुर्णवेळ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत चंदु, राम मधु असे सर्वजण मेळघाटात हे काम पहायचे. यावर्षी हे काम राजारामने चोखपणे पार पाडले.

——————–मधुकर माने

Advertisements

About DhadakMohim
चंदनास परीमळ, आम्हां काय त्याचे..!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: