धडक मोहीम अनुभव

धडक मोहीम अनुभव

15 ऑगस्ट पासून 24 पर्यंत मी धडक मोहीमेअंतर्गत एक स्वयंसेवक म्हणून कार्यरत होतो.

काटकुंभ base camp मधील 15 तारखेच्या प्रशिक्षणानंतर 16 तारखेला सायंकाळी बुटीदा ह्या गावी पुढील दहा दिवसांच्या कामासाठी पोहचवण्यात आले.

अनुभव चांगलाही होता आणि वाईटही. वाईट यासाठी की दूसर्‍या दिवशी सकाळीच गावात एक बालमृत्यू झाला. खंत याची वाटत होती की कदाचित दोन तीन दिवस आधी येणं झालं असतं तर त्या बाळाचे प्राण वाचवता आले असते. पालकांचा निष्काळजीपणा हा महत्वाचा मूद्दा होता. दहा-पंधरा दिवसांच्या बाळाला बाजाराला नेणे यासारख्या काही घटनांमागे कारण काहीही असले तरी मला ते पटले नव्हते. नंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. घर कसले, झोपडीच होती ती. गावापासून पाउण तासाच्या अंतरावर आहे ती. सोबत ORS चे पॅकेट्स नेले. खरं तर त्या पालकांना खूप रागवावं वाटलं. पण मी त्या आईला प्रेमाने सल्ला दिला ‘ लडकी तो मर गई। अब लडका बचा के रखो। अच्छे से खिलाओ पिलाओ। ऐसा ही चलता रहा तो वो भी मर जाएगा।‘ (तो मुलगाही कुपोषित आहे) आई डोक्यावरचे भांडे खाली घेत म्हणाली ‘ जो बनता है वही तो खिलाऍंगे।’

चार पाच दिवसांनंतर परत मी त्या झोपडीत गेलो. झोपडीत तीन-चार भांडे आणि एक चूल. बस! खजूर,बिस्कीट, वरणाची डाळ इत्यादी पंचपक्वान्नं (त्यांच्यासाठी तरी) ज्यांचा मी आग्रह करत होतो, त्याचा त्या झोपडीला गंधही नसावा.. मला खूप अवघडल्यासारखे झाले. त्या शांततेने मला गप्पच केले. मी परत निघालो. अर्ध्या वाटेवर आल्यावर लक्षात आले की ORS  चे पाकीट दिले नव्हते. देण्याचे कारणही नव्हते. पण घरात साखर नसेलच एवढा विश्वास त्या वास्तूने दिला होता..ORS वापरतीलच याची शाश्वतीही नव्हती. पण माहीत नाही का, मी परत माघारी आलो.ORS दिलं. अवलंबणार नाहीत याची खात्री असतानाही दोन चार गोष्टी कानावर घातल्या.

परिस्थीती वाईट आहे. वीज नाही. पक्का रस्ता नाही. शिक्षण तर नाहीच. सरकारी योजनांविषयी जागृती नाही. एवढंच काय,त्यांच्यासाठी महाराष्ट्रही नाही आणि भारतही नाही. असं काही असतं हे त्यांना माहितही नाही. विचीत्रच आहे ना?

कुछ लोग देस के लिये जीते है ।

इनको खबर ही नही है जहां वो जीते है वो देस कौन सा है।

अज्ञान एवढं आहे की ज्ञानाच्या दिव्याने काहीच होणार नाही.दिवाळसणच साजरा करावा लागेल.

आपण सहज म्हणतो, इथे अस्वच्छता खूप आहे. मूलं आंघोळच करत नाहीत. आपण करत होतो का? आई जबरदस्तीने घालायची. आपल्याला सवय लागली कारण आपल्याला ती लावण्यात आली. संधी मिळाली की इथे मूलं उत्साहाने आंघोळ करतात. साबण म्हणजे दूर्मीळ गोष्ट. त्यांना साबण दिला तर दहा मिनीटात त्याचा पेपर सोप होतो, करून बघा!

दूर्लक्षीत आहे सगळं. लोकांचं त्यांच्या मूलांकडे लक्ष नाही आणि लोकसेवकांचं लोकांकडे !

मानसीकता बदलायला हवी. रोगग्रस्त असूनही आरोग्याचं महत्व पटत नाही. दवाखान्यात जाण्याची प्रवृत्ती नाही. घरी कुणी येईल आणि उपचार करेल ही अपेक्षा.

दु:खाची स्मृती नाही की पुनराव्रुत्ती होण्याची भिती. वर्षानुवर्ष असचं चालत आलयं. बदल घडवून आणावाच लागेल. अज्ञानातच वाढतात आणि मृत्यूही अज्ञानातच. शिक्षणाचं, आरोग्याचं महत्व पटवून द्यावं लागेल.

मी प्रयत्न केला. थोडं यश मिळालं. आपल्याही हातभाराची गरज आहे. धडक मोहीम यशस्वी होण्यासाठी.

ही लोकं वर्षानुवर्ष अशीच जगत आहेत. ती बदलणार नाहीत. त्यांच्या या परिस्थितीला फक्त तेच जबाबदार आहेत असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी –

आसमांसी उचाई पाना,

या पहाडोंसे बुलंद होना,

नसीब की भी तो बाते है ।

युंही भीड में जूट जाना,

या मिट्टी मे मीट जाना

किसी की हसरत तो नही होती।

–          वसंत हिरालाल राजपूत.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय,

पुणे.

Advertisements

About DhadakMohim
चंदनास परीमळ, आम्हां काय त्याचे..!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: